प्रेषित महंमद पैगंबर लेखक : बार्नबी रॉजरसन प्रकाशन वर्ष – २००३ हा एक उत्तम चरित्रग्रंथ आहे. लेखकाने इस्लाम, कुराण व पैगंबराबद्दल पूर्ण आदराने लिहिले आहे. लेखकाने महंमदापूर्वीपासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा अरबस्तानचा इतिहास, महंमदाचा आयुष्यक्रम व इस्लामचा उदय व उत्कर्ष याबद्दल लिहिले आहे. महमदाचे चाळिशीपर्यंतचे साधेसुधे व्यक्तिमत्व, मूळचा निरक्षरपणा, व त्यानंतर साक्षात्कार झाल्यावरचे जीवन याचे ठसठशीत चित्रण केले आहे. इस्लामचा अरबस्तानातील प्रसार व विस्तार याची कथा वाचावयास मिळते. काही मुख्य माहितीची नोंद केली आहे. पुस्तक मुळातून जरूर वाचावे असे आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel