इथले लोक आपापसात दगड, धातू, हाडे इत्यादींचा व्यापार करत असत. एका मोठ्या भूभागावर मोठ्या प्रमाणात शिक्के, एकसमान लिपी आणि मानवनिर्मित मापतोलाचे प्रमाण मिळाले आहे. त्यांना चाकाचा परिचय होता आणि कदाचित आजकालच्या रथासारख्या वाहनाचा उपयोग ते करत होते. ते अफगाणिस्तान आणि इराण बरोबर व्यापार करत होते. त्यांनी उत्तर अफगाणिस्तानमध्ये एक व्यावसायिक केंद्र स्थापन केले होते ज्यामुळे त्यांना व्यापाय सोयीचा जात असे. अनेक हडप्पा संस्कृतीतील शिक्के मेसोपोटामिया इथे मिळाले आहेत ज्यावरून असे वाटते की मेसोपोटामिया इथे देखील त्यांचे व्यापारी संबंध होते. मेसोपोटामियाच्या अभिलेखांमध्ये मेलुहा सोबत व्यापाराची प्रमाणे मिळाली आहेत आणि त्यासोबतच दोन व्यापारी केंद्रांचा उल्लेख देखील मिळतो - दिलमून आणि माकन. दिलमून ची ओळख कदाचित इराणच्या खाडीतील बहारीन म्हणून केली जाऊ शकते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.