बळराम हे एक असं पात्र आहे की ज्याने सदैव चांगले आचरण केले. त्याला सुरवातीपासून ह्याची कल्पना होती की युद्धातून काहीही साद्ध्य होणार नाही म्हणून त्याने कुणाचीही बाजू घेण्यास नकार दिला. त्याव्यतिरिक्त त्यानी सगळ्यांना शांतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. युद्धाच्यावेळी तो सर्व योद्ध्यांच्या विशेषतः कृष्णाच्या अयोग्य वागण्याने व्यतीत झाला. कृष्ण आणि आपले विद्यार्थी भीम आणि दुर्योधन ह्यांना नैतिक मार्गांचा अवलंब करण्यास भाग न पाडू शकल्याने बळराम स्वतःला पराभूत समजू लागला आणि अतिशय खिन्न झाला. युद्ध संपल्यावर तो त्यांना सोडून हिमालयात चालला गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.