यादववंशीय सात्यकी हा शूरवीर योद्धा होता. तो कृष्णभक्त होता आणि अर्जूनाचा शिष्य होता. सात्यकीने पांडवांना कौरवांपेक्षा संपूर्णतः प्राधान्य दिले आणि कृष्णाने यादवांचे सैन्य देण्याचे कौरवांना वचन दिले असतांनासुद्धा सात्यकी पांडवांबरोबर राहिला. कुरुक्षेत्रातील युद्धात, यादवसैन्य कौरवांना देण्याचे वचन कृष्णाने दिले होते ही वस्तुस्थिती असतांनासुद्धा सात्यकीने कौरवांऐवजी पांडवाच्या कार्यात अत्यंत जोमाने आणि ठामपणे त्यांची साथ दिली. महाभारत युद्धाच्यावेळी सात्यकी हा एक औक्षहिणी पांडवसैन्याचा सेनापती होता. जेव्हा अर्जून आपली जरासंध वधाची प्रतिज्ञा पूर्ण करत होता त्यावेळी सात्यकीने युधिष्ठिराचे अर्जूनाच्या अनुपस्थित पकडू पाहणाऱ्या द्रोणाचार्यापासून संरक्षण केले. सत्याकीशी युद्ध करायचा कंटाळा आल्यानी द्रोणाने दैवी अस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली. गुरु अर्जूनाकडून सर्वप्रकारचे कौशल्य अवगत केल्यामुळे सात्यकी द्रोणाशी लढू शकला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.