हरिपाठाचे हे २८ अभंग ज्ञानेश्‍वरमहाराजांनी मोठ्या विश्‍वासानें रचले आहेत.

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वांसे ज्ञानदेवें ॥१॥

नित्यापाठ इंद्रायणी करी तो अधिकारी होईल

नित्यपाठकरीं इंद्रायणीं तीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥

स्वस्थ चित्त असावें

असावें स्वस्य चित्त एकाग्र मन । उल्हासें करुन स्मरण जीवीं ॥३॥

नेमनिष्ठ भाविकला अंतर्बाह्म अंतकाळी व संकटकाळीं हरीच सांभाळील

अंतकळीं तैसा सकटांचे वेळीं । हरी तया संभाळी अंतर्बाह्य ॥४॥

संतसज्जनांनी या ज्ञानाची प्रचीति घेतली, पण आळशी मंदमती कसा तरेल ?

संतसज्जनांनी घेतली प्रचेति । आळशी मंवमति केवि तरे ॥५॥

श्रीगुरुनिवृत्तिनाथांचे प्रमळ वचन श्रवण करुन ज्ञानेश्वर महाराज तत्काळ संतुष्ट झाले.

श्रीगुरुनिवृत्तिवचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel