गोविंदा :- काम करु लागले म्हणजे आपोआप सारे समजू लागते. चर्चा ह्या पुष्कळ वेळा निरुपयोगी असतात.

राम :- मग ठरले ना श्याम ? आज रात्रीपासून सुरु होऊ दे रामायण.

श्याम
:- होऊ देत सुरु भाकडकथा.

नामदेव
:- श्याम ! तू आमची अशी टिंगल रे का करतोस ? आमच्या भावना का दुखावतोस ? असतील तुझ्या भाकडकथा व रडकथा. आम्हांला त्या गोड आहेत, पवित्र आहेत.

श्याम
:- बरे, मी असे पुन: बोलणार नाही. परंतु कोणत्याही गोष्टीस अवास्तव महत्त्व देऊ नये. माझ्याजवळ बोलता हे ठीक. परंतु बाहेर जगात असे म्हणाल तर फजीत व्हाल, समजले ना ?

राम
:- चला रे आता जाऊ; श्यामला आता विश्रांती घेऊ दे. त्याला दिवसा त्रास नका देत जाऊ; रात्री त्याला बोलावे लागेल आणि एखाद्या वेळेस सांगता सांगता जर भावना फारच उचंबळल्या तर त्याला मागून पुष्कळच गळल्यासारखे होईल. श्यामला जपून लुटा. गाईला वाचवून तिचे दूध प्या.

नामदेव
:- गाडी धीरे धीरे हाक  ।  बाबा धीरे धीरे हाक.

श्यामकडे प्रेमाने भरलेल्या डोळयांनी पहात ते सारे मित्र कामाला निघून गेले. श्यामही क्षणभर डोळे मिटून पडला व नंतर 'गाडी धीरे धीरे हाक' हेच गाणे गुणगुणत त्या आराम-खुर्चीतच झोपी गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel