टेस्ला दररोज सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचे आणि रात्री बरोबर ८ वाजून १० मिनिटांनी जेवायचे. त्यानंतर पुन्हा पाहते ३ वाजेपर्यंत कामात गर्क होऊन जात. व्यायाम म्हणून ते दररोज ८ ते १० मैल पायी चालत असत. आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात ते पूर्णपणे शाकाहारी बनले होते आणि आहारात केवळ दूध, ब्रेड, मध आणि भाज्यांचा रस घेत असत. टेस्ला सांगत असत की ते केवळ २ तास झोप घेतात, परंतु आपले काम करत असताना मध्ये मध्ये डुलक्या काढत असत.
टेस्ला यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला होता आणि असे मानले जाते की त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होत. त्यांना ८ भाषा अवगत होत्या, ज्यामध्ये सर्बो-क्रोएशीयन, चेक, अंग्रेजी, फ़्रेंच, जर्मन, हंगेरीयन, ईटालीयन आणि लैटीन या भाषांचा समावेश आहे.
टेसला अविवाहीत होते आणि त्यांचे म्हणणे होते की त्यांचे ब्रम्हचर्य हे त्यांच्या वैज्ञानिक शोधांना सहाय्यक ठरले आहे. एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की त्यांनी विवाह न करता विज्ञानासाठी एक मोठा त्याग केला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.