सुरुवातीला काही कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर टेस्ला यांनी पेरीस मध्ये “कॉन्टीनेंटल एडीसन कंपनी” मध्ये नोकरी केली. या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना अमेरिकेचे महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी एडिसन यांच्या कंपनीला एका नवीन उंचीवर नेले, परंतु लवकरच दोघांमध्ये वाद झाले जे एका मोठ्या विद्युत वितरण प्रणाली वरून होते. १८८२ मध्ये त्यांनी थोमस अल्वा एडिसन यांची कंपनी कांटीनेंटल एडीसन कंपनी, फ्रांस इथे नोकरी केली आणि विद्युत उपकरणांच्या डिझाईन मध्ये सुधारणा करू लागले. जून १८८४ मध्ये त्यांची न्यूयॉर्क , अमेरिका इथे बदली करण्यात आली. टेस्ला यांनी एडिसन यांच्या समोर त्यांची मोटार आणि जनरेटर यांना जास्त प्रभावी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर मिळतील. टेस्ला यांनी यासे करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द फिरवला. एडिसन यांनी आपले वचन हे अमेरिकन हास्य (American Humor) आहे असे सांगून टेस्ला यांची चेष्टा केली. तेव्हा रागाने टेस्लानि एडिसन ची सोबत सोडून दिली. एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर त्यांनी आपली स्वतःची कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक लाईट एन्ड मैनुफैक्चरींग हिची स्थापना केली. या कंपनी मध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर चे डिझाईन तयार केले. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते.