गांधारी एक विधवा होती हि गोष्ट बराच काळ कौरवांना माहिती नव्हती. जेव्हा हि गोष्ट महाराज धृतराष्ट्र यांना समजली तेव्हा त्यांना प्रचंड राग आला. त्यांना वाटले कि गांधारीचा आधीच कोणाशी तरी विवाह झाला होता आणि एखाद्या कारणाने तो मारला गेला. धृताराष्ट्राना या गोष्टीचे अतिशय दुःख झाले आणि त्यांनी या गोष्टीसाठी गांधार नरेश सुबाल यालाच जबाबदार धरले. त्याने सुबाल राजाला संपूर्ण परिवारासहित कैद करून कारागृहात डांबले.
तिथे त्यांना जेवणासाठी केवळ एका माणसा पुरतेच जेवण देण्यात येई. केवळ एका व्यक्तीच्या अन्नाने सर्व परिवाराचे पोट कसे भरू शकले असते? हा संपूर्ण परिवाराला भुकेने तडफडून मारण्याचा डाव होता. तेव्हा राजा सुबाल याने निर्णय घेतला कि हे जेवण फक्त त्याचा सर्वांत लहान पुत्रालाच देण्यात येईल, जेणे करून परिवारातील एक तरी सदस्य जिवंत राहील.
एक एक करून सुबाल चे सर्व पुत्र मरू लागले. सर्व जण आपल्या हिश्शाचे अन्न शकुनीला देत असत जेणे करून तो जिवंत राहील आणि कौरवांचा नाश करू शकेल. सुबाल ने आपला सर्वांत छोटा पुत्र शकुनी याला सूड घेण्यासाठी तयार केले. मृत्युपूर्वी सुबाल ने धृतराष्ट्र महाराजांना विनंती केली कि शकुनीला सोडा, धृतराष्ट्राने त्याची विनंती मान्य केली.
राजा सुबालचा सर्वांत छोटा पुत्र दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्षात शकुनी होता. शकुनी यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या परिवाराचा अंत होताना पहिला होता आणि शेवटी त्ते जिवंत राहिले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel