गांधारी चे २ विवाह झाले होते

असे मानले जाते कि गांधारीच्या पहिल्या विवाहाच्या वेळी ज्योतिष्यांनी असे सांगितले होते कि तिच्या पहिल्या विवाहावर संकट आहे. त्यामुळे तिचा पहिला विवाह दुसऱ्या कोणाशी तरी करून द्या आणि नंतर धृतराष्ट्राशी करा. त्यांच्या सांगण्यावरून गांधारीचा पहिला विवाह एका बकऱ्या सोबत करून देण्यात आला होता. नंतर त्या बकऱ्यचा बळी देण्यात आला.
असे म्हटले जाते कि गांधारीला कोणत्या तरी प्रकारच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी ज्योतिष्यांनी असा सल्ला दिला होता. त्या कारणाने गांधारी प्रतिक रूपाने विधवा मानण्यात आली आणि नंतर तिचा विवाह धृतराष्ट्राशी करून देण्यात आला. असे का केले यामागे देखील कारणे होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel