विरोधाभास

काळाच्या यात्रेच्या धारणेच्या मार्गात सर्वांत मोठा धोंडा म्हणजे या कल्पनेशी जोडलेल्या दंतकथा आणि खूप सारे विरोधाभास आहेत.

विरोधाभास १:

 या उदाहरणानुसार एखादी व्यक्ती बिन माता पित्याची देखील असू शकते. काय होईल जर एखाद्या व्यक्तीने भूतकाळात जाऊन आपल्या जन्माच्या आधीच आपल्या माता पित्यांची हत्या केली? प्रश्न असा आहे की जर त्या व्यक्तीचे माता पिता हे त्याच्या जन्माच्या आधीच मृत्यू पावले तर त्यांची हत्या करण्यासाठी ती व्यक्ती जणामालाच कशी येऊ शकते?


विरोधाभास २ :
हा असा विरोधाभास आहे ज्यामध्ये एका व्यक्तीचा कोणताही भूतकाळ नाही. उदाहरण म्हणून आपण असं मानूयात की एक युवा संशोधक आपल्या प्रयोगशाळेत बसून समय यान मशीन बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. अचानक एक वृद्ध व्यक्ती त्याच्या समोर प्रकट होतो आणि त्याला समय यान बनवण्याची कृती देऊन गायब होतो. युवा संशोधक समय यात्रा करून मिळालेल्या माहितीचा वापर करतो आणि शेयर मार्केट, रेस, खेळांचे सट्टे यांच्या मार्फान प्रचंड पैस्दा कमावून अब्जपती बनतो. जेव्हा तो वृद्ध होतो तेव्हा भूतकाळात जाऊन आपल्याच युवा अवस्थेला समय यान बनवण्याची कृती देऊन येतो. प्रश्न असा आहे की हे यान बनवण्याची मुल कृती कुठून आली?

विरोधाभास ३ :
या विरोशाभासात एक व्यक्ती स्वतःचीच माता आहे. जेन ला एका अनाथ आश्रमात एक अनोळखी माणूस सोडून गेला होता. जेव्हा जेन तरुण होते, तिची एका अनोळखी माणसाशी मैत्री होते, आणि त्याच्या संसर्गामुळे ती गर्भवती होते. त्याच दरम्यान एक दुर्घटना घडते. जेन एका मुलीला जन्म देताना मारता मारता वाचते परंतु त्या मुलीचे रहस्यमय रीतीने अपहरण होते. जेन चा जीव वचवत असताना डॉक्टर लोकांच्या असे लक्षात येते की जेन ला पुरुष आणि स्त्रिया यांची दोघांचीही जननेंद्रिय आहेत. डॉक्टर जेन ला वाचवण्यासाठी तिला पुरुष बनवतात. आता जेन्न बनते "जिम". यानंतर जिम दारुडा बनतो. एक दिवस भटकत असताना त्याला एका बार मध्ये एक बाटेंडर भेटतो जो एक काळाची यात्रा करणारा प्रवासी असतो. जिम त्या माणसासोबत भूतकाळात जातो जिथे त्याला एक मुलगी भेटते. ती मुलगी जिम पासून गर्भवती होते आणि एका मुलीला जन्म देते. अपराधी भावनेने जिम त्या मुलीचे अपहरण करून तिला एका अनाथ आश्रमात नेऊन सोडतो. त्यानंतर जिम हा काळाची यात्रा करणार्यांमध्ये सामील होतो आणि एक भटकते आयुष्य जगतो. काही वर्षांनी त्याला स्वप्न पडते की त्याला बारटेंडर बनून भूतकाळात जिम नावाच्या एका माणसाला भेटायचे आहे. प्रश्न - जेन चे माता, पिता, भाऊ, बहिण, आजोबा, आजी, मुलगा, मुलगी, नातू, नात कोण आहेत?

याच सर्व विरोधाभासांमुळे काळाच्या यात्रेला असंभव मानले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel