भौतिक विज्ञानाने आपण त्यांच्या शरीराच्या आकाराचा देखील अंदाज लावू शाज्तो. ते पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहावर राहतात आणि त्यांची घनता पाण्याच्या घानतेसारखी आहे (पृथ्वीवरील जीवना प्रमाणे) असे मानले तर, परग्रही जीवांचा आकार हा पृथ्वीवरील जीवांच्या समान असेल. अनुपाताच्या सिद्धांतामुळे किंगकॉंग किंवा गोडझिला सारखे महाकाय आकाराचे प्राणी संभाव नाहीत. अनुपाताच्या सिद्धांतानुसार एखाद्या वस्तूचा आकार वाढवला तर भौतिक शास्त्राचे नियम उग्र रूपाने बदलतात.




दानवाकार परग्रही
हॉलीवुड च्या चित्रपटांत काही जीव हे किंगकॉंग किंवा गोडझिला सारखे विशालकाय दाखवले जातात. त्याच प्रकारे परग्रही जीवांना देखील कधी कधी विशालकाय मानले जाते. परंतु कोणत्याही जीवाच्या आकाराला एक मर्यादा असते, तो त्या मर्यादेपेक्षा मोठा असू शकत नाही. जर किंग कॉंग प्रत्यक्षात असता तर त्याने न्यूयॉर्क मध्ये अशी दहशत पसरवली नसती. तसेच त्याने पहिले पाऊल टाकताच त्याचे पाय मोडले असते. जर तुम्ही एखाद्या वानराला १० पट मोठे केलेत तर त्याचे वजन हजार पट वाढेल. दहा पट मोठे केल्याने त्याची लांबी, रुंदी आणि उंची दहा दहा पट वाढेल ज्यामुळे एकूण पृष्ठफळ 10x10x10 = 1000 पट वाढेल आणि त्यासोबतच वजन देखील १००० पट वाढेल. कोणत्याही प्राण्याची मजबूती ही त्याची हाडे आणि मांस पेशींच्या आकारावर अवलंबून असते. हाडे आणि मांस पेशींची मजबूती 10x10 = 100 पट वाढेल परंतु वजन १००० पट वाढेल. दुसऱ्या शब्दात किंग कॉंग हा वानारापेक्षा १० पट मोठा झाल्यावर त्याची मजबूती १०० पट वाढेल आणि वजन १००० पट वाढेल. आकार वाढवल्यावर वानराचे वजन त्याच्या मजबूती पेक्षा अधिक वेगाने वाढते. त्यामुळे तो एका सामान्य वनरापेक्षा १० पट कमजोर असेल. त्यामुळे त्याचे पाय त्याचा भार सोसू शकणार नाहीत आणि त्याने पहिले पाउल टाकल्यावर त्याचे पाय मोडून जातील.

मुंगी
लहानपणी शाळेत आपण शिकले आहे की मुंगी तिच्या वजनाच्या ५० पट भार उचलू शकते. याचा अर्थ असा नव्हे की तिचा आकार एखाद्या घरा एवढा केला तर ती मोठे घर उचलू शकेल. किंग कॉंग सारखेच घराच्या आकाराच्या मुंगीचे पाय मोडून जातील. जर आपण एखाद्या मुंगीला १००० पट मोठे केले तर ती साधारण मुन्ग्यांपेक्षा १००० पट कमकुवत बनेल. (विशालकाय मुंगी श्वास गुदमरून मारून जाईल. मुंगी आपल्या शरीराच्या बाजूला असलेल्या छिद्रातून श्वास घेते. या छीद्रांचे क्षेत्रफळ त्रिज्येच्या वर्गाच्या प्रमाणात बदलेल तर चीन्तीचे आकारमान त्रिज्येच्या घनफळाच्या प्रमाणात वाढेल.) लक्षपूर्वक पहा की स्केटिंग आणि जिम्नास्टीक चे खेळाडू सरासरीपेक्षा लहान असतात, त्यांच्या आकाराचे प्रमाण बाकी सामान्य माणसा प्रमाणेच असते. त्या कारणाने त्यांच्या मांस पेशींची क्षमता अन्य उंच मानवाच्या तुलनेत अधिक असते.




आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel