श्री ईशान्येश्वर महादेवाची स्थापना ही वाईटावर चांगल्याचा विजय आणि कशा प्रकारे महा शक्तिशाली असून देखील शंकराच्या शक्तीने दानवांचा संहार झाला या गोष्टींकडे संकेत करते. प्राचीन काळी तुहुंड नावाचा एक दैत्य होता. त्याने देवतांसोबत ऋषी, गंधर्व, यक्ष यांना देखील आपल्या अधिपत्याखाली आणले होते. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती अनो उच्चश्रवा घोडा देखील आपल्या ताब्यात घेतला होता. त्याने स्वर्गाचे दार रोखून देवतांचे सर्व अधिकार हिसकावून घेतले. त्यामुळे सर्व देव चिंतीत होऊन विचार करू लागले. तेवढ्यात नारद मुनी तिथे पोचले. तेव्हा सर्व देवतांनी त्यांना वंदन करून तुहुंड राक्षसाने केलेल्या अत्याचार आणि कुकर्माविषयी सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. सोबतच नारद मुनिना असा आग्रह केला की या तुहुंड दानवाच्या कहरातून वाचण्याचा मार्ग आम्हाला सुचवा. तेव्हा नारद मुनी काही काळ ध्यानमग्न बसले आणि नंतर त्यांनी सर्व देवताना सांगितले की तुम्ही सर्व महाकाल वनात जा आणि तिथे जाऊन इन्द्रद्युम्नेश्वर च्या जवळ ईशानेश्वर या स्थानावर असलेल्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन करा.
नारद मुनींच्या सांगण्यावरून सर्व देवता महाकाल वनात गेले आणि तिथे जाऊन मुनींनी सांगितलेल्या त्या दिव्य शिवलिंगाचे मनोभावे भक्तिभावाने पूजन केले. सर्वांनी शंकराची स्तुती केली. तेव्हा त्या शिवालीन्गातून धूर निघू लागला आणि एक भीषण ज्वाला प्रकट झाली. त्या अग्नीने मुन्डासुराचा पुत्र तुहुंड याला त्याच्या सैन्यासकट भस्म करून टाकले. अशा प्रकारे तुहुंड चा विनाश झाल्यावर सर्व देवताना आपले स्थान आणि आपले अधिकार पुन्हा प्राप्त झाले. तेव्हा सर्व देवता म्हणाले की आम्हाला ईशान्येश्वर इथेच आमचे स्थान आणि अधिकार परत मिळाले, त्यामुळे या लिंगाचे नाव ईशान्येश्वर ठेवू आणि हे दिव्य शिवलिंग इथून पुढे ईशान्येश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य ईशान्येश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याला शत्रूंवर विजय प्राप्त होतो. त्याच्या पापांचा नाश होती आणि त्याची सर्व कार्य संपन्न होतात. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले श्री ईशान्येश्वर महादेव मंदिर पटनी बाजार भागात मोदी गल्लीच्या मोठ्या दरवाजात उभे आहे.