प्राचीन काळी एक निमी नावाचा राजा होता. त्याच्या पुण्य कर्मांमुळे यमाचे लोक त्याला खास विमानात बसवून स्वर्गात नेत होते. यमदूत त्याला दक्षिण मार्गाने नरकाच्या समोरून घेऊन जात होते. राजाने नरकात हजारो लोकांना आपल्या कर्माची फळे भोगताना, अनेक शिक्षा भोगताना पहिले. त्या लोकांना अपर त्रास होत होता. राजाने यामादुताला विचारले की माझ्या हातून असे काय घडले की ज्यामुळे तुम्ही मला या मार्गाने नेत आहात आणि मला हे सर्व पाहावे लागत आहे? यावर यमदूत म्हणाले की एकदा श्राद्ध कर्माच्या वेळी तू दान केले नव्हतेस, म्हणून तुला इथून जावे लागत आहे. यानंतर राजाने विचरले की कोणत्या कर्मांमुळे मला स्वर्ग मिळत आहे? यावर यमदूत म्हणाला की तू अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात चतुर्दशीच्या दिवशी महाकाल वनात मानकेश्वर महादेवाचे पूजन केले होतेस. ज्याचे फळ म्हणून तुला स्वर्ग प्राप्ती होत आहे.
जेव्हा ते लोक तिथून पुढे वाटचाल करू लागले तेव्हा नरकातले लोक म्हणाले की राजा तू थोडा वेळ अजून थांब. तुझ्या शरीराला स्पर्श करून येणारी हवा या कष्टांत आम्हाला आराम देत आहे. तेव्हा राजाने दूताला सांगितले की तो आता स्वर्गाला जाणार नाही आणि इथेच उभा राहून या लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर इंद्र तिथे आला आणि त्याने राजाला स्वर्गात येण्याची विनंती केली. राजाने त्याला नम्रपणे नकार दिला आणि विचारले की हे पापी लोक त्यांच्या पापातून मुक्त कसे होतील? यावर इंद्र म्हणाला की जर तू तुझ्या देवदर्शनाचे पुण्य त्यांना दान केलेस तर ते सर्व जन मुक्त होतील. तेव्हा राजाने आपले पुण्य फळ सर्व पापी लोकांना दान केले ज्यामुळे ते सर्व पापमुक्त होऊन नाराकातून मुक्त झाले. मान्यता आहे की अनरकेश्वर महादेवाच्या दर्शनाने नरकातून मुक्ती मिळते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात चतुर्दशीच्या दिवशी पूजन केल्यामुळे मनुष्याच्या सर्व जन्मातील पापे नष्ट होतात आणि तो स्वर्ग सुख उपभोगतो.