एक काळ असा होता जेव्हा दैत्य आणि देवता सारखे लढत असत. एकदा अशाच एका युद्धात दैत्यांचा पराभव झाला तेव्हा शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्या प्राप्त करण्यायचा निश्चय केला. ते तप करण्यासाठी शिव धामाला गेले आणि दैत्यांना सांगितले की आपले वडील भृगु यांच्या आश्रमात राहावे. जेव्हा देवताना हे समजले तेव्हा ते असुरांना मारायला निघाले. असुर पळत पळत भृगुंच्या पत्नीकडे गेले. तिच्याकडे इंद्राला गतिहीन करण्याची क्षमता होती. देवता घाबरून विष्णूकडे गेले. विष्णूने त्यांना आपल्या शरीरात प्रवेश करायला सांगितला. भृगुंच्या पत्नीने विष्णूला तसे करण्यास मनाई केली परंतु विष्णूने रागावून सुदर्शन चक्राने तिला मारून टाकले. त्यामुळे चिडून जाऊन भृगु ऋषींनी विष्णूला शाप दिला की तो पृथ्वीवर जन्म घेऊन पुनःपुन्हः जन्म मृत्युच्या झांझटात अडकत राहील. या शापाच्या प्रभावानेच विष्णूने पृथ्वीवर एवढे अवतार घेतले आणि रामायण, महाभारत यांचा जन्म झाला.