अमर सिंह चमकीला

पंजाबी संगीत जगतातला एक उत्कृष्ट तारा. या व्यक्तीचा मृत्यू हे आजही एक गूढ आहे.
आपल्या गाण्यांमधून अमर विवाहानंतरची नाती, मद्य पान, राग इत्यादी विषयांवर प्रकाश टाकत असत. त्यांना खरे बोलणारा म्हणूनच ओळखले जात असे. जेव्हा ते आपल्या क्षेत्रात यशाच्या उत्तुंग शिखरावर होते, तेव्हा अनेक वेळा खलिस्तानी दहशतवाद्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. कदाचित या धमक्या अशासाठी असाव्यात की त्यांची गाणी ही समाजाची मुळे हलवून टाकू शकत होती आणि त्यांची पत्नी ही त्यांच्या समाजाच्या बाहेरील होती.
८ मार्च १९८८ रोजी जेव्हा ते मेह्समपुर पंजाब इथे प्रदर्शन करण्यासाठी पोचले तेव्हा साधारण २ वाजण्याच्या सुमारास गाडीतून उतरताना त्यांना कोणीतरी गोळी मारली. अमरज्योत त्या वेळी गर्भवती होत्या आणि त्यांच्या छातीत गोळी मारण्यात आली तर चमकीला आणि त्यांचे साथीदार गिल सुरजीत आणि राजा यांना देखील ४ गोळ्या लागल्या. याचा आरोप दहशतवाद्यांवर गेला, परंतु काही लोकांचे असे म्हणणे आहे की अन्य पंजाबी गायकांनी अमर च्या यशामुळे चिडून जाऊन त्याच्या विरुद्ध हा कट रचला. त्याच्या हत्येनंतर कर्फ्यू लावण्यात आला, कारण दंगली उसळल्या होत्या. या घटनेबाबत कोणालाही अटक झाली नाही आणि शेवटपर्यंत हत्यारे सापडले नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel