शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आहेत. ते भृगु ऋषी आणि हिरण्यकश्यपू ची कन्या दिव्या हिचे पुत्र आहेत. त्यांचे जन्माचे नाव शुक्र उशानास आहे. त्यांना भगवान शंकराने मृत संजीवनी विद्येचे ज्ञान दिले होते, ज्याच्या उपयोगाने ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करत असत.
भगवान वामनाने त्यांचा एक डोळा फोडला होता
ग्रंथांनुसार भगवान विष्णूनी वामन अवतार घेऊन बळी राजाकडे ३ पद जमीन मागितली. शुक्राचार्यांना त्यातली मेख लक्षात आली होती. म्हणून ते सूक्ष्म रूपाने बळीच्या कमंडलूत जाऊन बसले, जेणेकरून कमंडलूतून पाणी बाहेर येऊ नये आणि बळीला जमिनीचे दान करता येऊ नये. तेव्हा वामन भगवानने कमंडलूत एक काडी घातली ज्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. म्हणूनच त्यांना एकाक्ष असे देखील म्हटले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.