द्रौपदी अपमानाने किंचाळायची, की आपले पती आपल्या अपमानाचा सूड घेतील याबद्दल तिच्या मनात शंका होती. अर्थात तिला असे वाटण्यामागे कारण होते. त्यांनी तिच्या मेहुणीचा पती जयद्रथ याला मारले नाही, जरी त्याने तिला तिच्या घरातून बाहेर ओढत आणले होते, तिला आपली उपपत्नी बनवण्यासाठी. अज्ञातवासातील शेवटच्या वर्षात कीचकाने तिचा घोर अपमान आणि छेडछाड करून देखील, केवळ आपली ओळख उघड होईल म्हणून कीचकाचा वध करायला तिचे पती कचरत होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.