खूप काळापूर्वी कल्माशपाद नावाचा एक राजा होऊन गेला. एकदा त्याने वनात वसिष्ठ मुनींचा पुत्र आणि सुनेला पहिले. त्या वेळेला त्यांचा पुत्र ध्यानमग्न होता. राजाने मुनींना सांगितले कि मार्गातून बाजूला व्हा, परंतु मुनींनी त्याचे ऐकले नाही. तेव्हा राजाने क्रोधाने मुनींवर चाबकाने प्रहार करण्यास सुरुवात केली. हे पाहून वसिष्ठ मुनींच्या दुसऱ्या पुत्राने राजाला शाप दिला कि तू राक्षस होशील आणि मनुष्याचे भक्षण करशील. राजाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली परंतु त्याला माफी मिळाली नाही. राजाने वसिष्ठ मुनींच्या पुत्राला आणि सुनेला खाल्ले. रात्री राजाला कित्येक वाईट स्वप्ने पडली. त्याने सकाळी मंत्रीना सांगितले. मंत्री राजाला घेऊन वसिष्ठ मुनींकडे गेले.
वसिष्ठ मुनींनी राजाला सांगितले कि तू अवंतिका नगरीतील महाकालेश्वर च्या जवळ असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घे. त्याने तुझ्या सर्व दुःस्वप्नांचा नाश होईल. त्यांच्या सांगण्यानुसार राजा अवंतिका नगरीत आला आणि इथे येऊन शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजन केले. राजाच्या वाईट स्वप्नांचा नाश झाल्या कारणाने हे शिवलिंग स्वप्नेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते कि स्वप्नेश्वर महादेवाच्या दर्शनाने वाईट स्वप्नांचा नाश होतो. हे मंदिर महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात वसलेले आहे.