पृथू एक सूर्यवंशी राजा होता. तो वेन चा पुत्र होता. स्वयंभू मनु चा वंशज राजा अंग याचा विवाह सुनिता नावाच्या स्त्रीशी झाला होता. वेन त्यांचा पुत्र झाला. तो संपूर्ण धरतीचा एकमेव राजा होता. सिंहासनावर बसताच त्याने यज्ञ - कर्म इत्यादी बंद केले. तेव्हा ऋषींनी मंत्राच्या शक्तीने त्याला मारून टाकले. परंतु सुनीताने आपल्या पुत्राचे शव सांभाळून ठेवले. राजाच्या अनुपस्थितीत पृथ्वीवर पाप कर्म वाढू लागली. तेव्हा ऋषींनी मृत राजा वेनच्या हातांचे मंथन केले, ज्याचे फळ म्हणून स्त्री - पुरुषाचा एक जोडा प्रकट झाला. पुरुषाचे नाव पृथु होते तर स्त्रीचे नाव अर्चि होते. अर्चि पृथूची पत्नी झाली. पृथू संपूर्ण धरतीचा एकमात्र राजा झाला. पृथूनेच ओबड धोबड धरतीला लागवडीयोग्य बनवले. नद्या, झरे, पर्वत इत्यादींची निर्मिती केली. राजा पृथूच्या नावावरूनच या धरतीचे नाव पृथ्वी पडले.