महाभारतानुसार माण्डव्य नावाचे एक ऋषी होते. राजाने चुकीने त्यांना चोर समजून सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळावर काही दिवस लटकत राहिल्यावरही जेव्हा त्यांचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. आणि त्याने ऋषींची क्षमा मागून त्यांना सोडून दिले.
तेव्हा ऋषी यमराजाकडे गेले आणि त्याला विचारले कि मी असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे मला अशा खोट्या आरोपातून शिक्षा मिळाली? तेव्हा यमराजाने सांगितले कि तुम्ही १२ वर्षांचे असताना एका पतंग्याच्या शेपटीला सुई टोचली होती, त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला हे फळ मिळाले.
तेव्हा ऋषींनी यमराजाला सांगितले कि १२ वर्षाच्या वयात कोणालाही धर्म - अधर्म यांचे ज्ञान नसते. तू लहान अपराधाची मोठी शिक्षा दिली आहेस. म्हणून मी तुला शाप देतो कि तुला शुद्र योनीत एक दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. या शापाचा प्रभाव म्हणूनच यमराजाला विदुराच्या रुपात जन्म घ्यावा लागला.