धर्म ग्रंथांनुसार भगवान विष्णूने दुसरा अवतार वराह रुपात घेतला होता. वराह अवताराची कथा अशी आहे – प्राचीन काळी दैत्य हिरण्याक्ष याने पृथ्वी नेऊन समुद्रात लपविली. तेव्हा ब्रम्हदेवाच्या नाकातून विष्णू वराह रूपाने प्रकट झाले. भगवान विष्णूंचे हे रूप पाहून सर्व देवता आणि ऋषीमुनींनी त्यांची स्तुती केली. सर्वांच्या आग्रहाखातर भगवान वाराहानी पृथ्वीचा शोध घेण्यास प्रारंभ केला. आपल्या नाकाच्या सहाय्याने त्यांना पृथ्वीचा पत्ता लागला आणि समुद्राच्या आत जाऊन आपल्या सुळ्यांवर (दात) ठेवून ते पृथ्वीला बाहेर घेऊन आले.
जेव्हा हिरण्याक्ष दैत्याने हे पहिले तेव्हा त्याने भगवान विष्णूंच्या वराह रुपाला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. शेवटी भगवान वराह ने हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. त्यानंतर भगवान वराह ने आपल्या खुरांनी पाण्याला स्तंभित केले आणि त्यावर पृथ्वीची स्थापना केली.