धर्म ग्रंथांमध्ये भगवान शंकराला महाकाळ किंवा महाकाल असं देखील म्हटलेलं आहे. महाकाळ याचा अर्थ आहे काळ म्हणजे मृत्यू देखील ज्याच्या अधीन आहे, ज्याला शरण आलेला आहे. भगवान शंकर जन्म - मृत्यू चक्रापासून मुक्त आहेत. अनेक धर्म ग्रंथांमध्ये भगवान शंकराला अनादी आणि अनंत किंवा आजन्म म्हटलेले आहे. भगवान शंकराशी संबंधित अनेक ग्रंथ प्रचलित आहेत, परंतु शिवपुराण त्या सर्व ग्रंथांत प्रामाणिक आणि सर्वश्रेष्ठ मनाला गेला आहे.
या ग्रंथामध्ये भगवान शंकराशी निगडीत अनेक रहस्यमय गोष्टी सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त या ग्रंथामध्ये अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या सर्वसामान्य लोकांना माहिती नाहीत. शिव पुराणामध्ये भगवान शंकरांनी देवी पार्वतीला मृत्यूशी संबंधित काही विशेष संकेत संगितले आहेत. हे संकेत समजून घेतले तर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे या गोष्टीची माहिती करून घेता येऊ शकते. हे संकेत पुढीलप्रमाणे आहेत .