हनुमानाचा जन्म


जेव्हा अग्नी देवाने अयोध्येचे महाराज दशरथ यांना आपल्या राण्यांमध्ये वाटण्यासाठी खीर दिली जेणेकरून त्यांच्या घरात अलौकिक आणि अद्भुत मुलांचा जन्म व्हावा, तेव्हा त्या खिरीतील छोटासा हिस्सा एका घारीने पळवला आणि जिथे अंजनी तपश्चर्या करत होती तिथे घेऊन गेली. वायू देवाने त्या खिरीचा एक थेंब अंजनीच्या ओंजळीत टाकला. जेव्हा तिने त्या खिरीच्या थेंबाचे सेवन केले तेव्हा तिच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अशा प्रकारे भगवान शंकराने वानराचे रूप घेतले आणि माता अंजनीच्या गर्भातून हनुमानाच्या रूपाने जन्म घेतला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel