‘मी वाघ आहे, अस्वल आहे?’

‘सर्कशीत माणसेही लागतात.’

‘मी का मोठा आहे?’

‘आम्हांला लहान मुलेच हवी असतात. तुझ्यासारखी. तू नीट वाग. तुझे चीज होईल. परंतु अळंटळं करशील तर तात्र चौदावे रत्न. तेथे रडायचे नाही. हसायचे नाही. शिस्तीत राहायला शिकायचे.

‘मला रडू येईल.’

‘ते रडू कसे पळवायचे ते मला माहित आहे.’

‘दादा!’  कृष्णनाथने हाक मारली.

फाडकन् त्याच्या कानशिलात बसली.

‘गप्प बस म्हणून सांगितले ना?’  मॅनेजर गर्जला.

मोटार जात होती. किती वेळ ती जात राहणार? कोठे थांबणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel