‘त्यांच्या आधी मी गेलेली बरी; नाही का?’

‘आई, तुम्ही दोघे बरे व्हाल.’

‘खोटी आशा. आम्हांला दोघांना आमंत्रण आले आहे. मीच पुढे जाते. हे बघ, रघुनाथ, एक मागणे आहे तुमच्याजवळ. बाळाला सांभाळा. जरा लाडावलेला आहे. परंतु शहाणा आहे. समजावून सांगितले म्हणजे ऐकतो. त्याचे तुम्ही सारे करा. त्याचे शिक्षण करा. लहानाचा मोठा करा. त्याचा पुढे संसार मांडून द्या. मुंज आम्ही केली. त्याचे लग्न तुम्ही करा. रमा, तुझ्या ओटीत बाळाला घालून जात आहे. सांभाळ त्याला. बायकांच्या हातात सारे असते.’

‘कृष्णनाथाचे मी सारे करीन. तुम्ही काळजी नका करु.’

‘आज वार कोण?’

‘आज गुरुवार’

‘दत्तगुरुंचा वार, तसबिरीला हार करुन घाल. प्राजक्तीच्या फुलांचा सुंदर घवघवीत हार करा. आता उजाडेलच. कृष्णनाथ उठला का?’

‘त्याला उठवू का?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel