मोरी गाय

गाय ही भारतवर्षाची मायमाउली, गायीने भारताला वाढवले; भारताला चढवले. वेदकालापासून ऋषीमुनींनी गायींची थोरवी ओळखली; तिचा महिमा वाढवला. तिची गीते त्यांनी गाइली. तिची सुरपति-नरपतींनी पूजा केली. परंतु आज स्थिती पालटली आहे. गायींची उपासमार होत असून म्हशींची पूजा होत आहे. सारे पारडे फिरले आहे. आज भारताला स्वत्व नाही. विचार नाही, सदाचार नाही, म्हणूनच वैभव नाही.

पांडुरंग सदाशिव सानेपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel