ही सामान्य गोष्ट आहे की आपल्या डोक्यात काही पडू नये म्हणून आपण एखाद्या उघड्या जीन्याखालून जात नाही, परंतु असं करण्याची काही अन्य कारणेही आहेत. एक त्रिकोण (जिन्याचा आकार) काही लोकांसाठी जीवनाचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही या त्रिकोणाच्या खालून जाता तेव्हा तुम्ही आपल्या नशिबाला आव्हान देत असता. तुम्ही त्या त्रिकोणात राहणाऱ्या वाईट अत्म्यानाही जागे करत असता जे कदाचित तुमच्या अशा वागण्याने त्रस्त होऊ शकतात. जर तुम्ही चुकून अशा एखाद्या जिन्याच्या खालून गेलात तर त्या अपशकुनापासून वाचण्यासाठी आपला अंगठा तर्जनी आणि मधलं बोट यामध्ये दाबून धरा. दुसरा मार्ग म्हणजे दोन्ही हाताची बोटं वाकवून पलीकडच्या निशाणाला वाईटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.