या सर्वात जास्त प्रचलित अंधश्रद्धेचं एक मूळ त्या काळापासून आहे जेव्हा काही संस्कृतीत असं मानलं जायचं की देव झाडात वास करतो. जेव्हा कधी कोणाला देवाच्या मदतीची गरज भासत असे, तो हलक्या हाताने झाडाच्या सालीला स्पर्श करत असे. आणि एकदा का त्याची मनोकामना पूर्ण झाली की पुन्हा तो हलक्या हाताने झाडावर खटखट करून देवाचे आभार मानत असे. या प्रथेची सुरुवात ख्रिश्चन लोकांपासूनही झालेली असू शकते जे असं करून येशू मशीहाला चांगल्या भाग्यासाठी धन्यवाद देत असत. येशू मशीहाचा मृत्यू लाकडाच्या फळीवर झाला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.