द्रौपदी वस्त्र हरण

आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने  पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.

"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे

आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel