आतापर्यंत पुनर्जन्मावर आधारित असे अनेक चित्रपट बनले आहेत , मधुमती (१९५८) हा या विषयावर आलेल्या अगदी सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे. २०१० मधला थाई चित्रपट ' अंकल बुमी - हु कॅन रिकॉल हिज पास्ट लाइवस ' ला २०१० च्या कॅनस फिल्म फेस्टिवल मध्ये पाल्मे डोर पुरुस्कार मिळाला होता. जॉन कारिगिए चं गाण “ सो मेनी लाइवस ” ला पुनर्जन्माच गाणं म्हटलं जातं. हि अशा जीवाची कहाणी आहे जो सुरवंटापासून मधमाशी, स्पर्म व्हेल आणि शेवटी चिम्पान्झीचं रूप घेतो. १९७४ च्या सत्यजित रे दिग्दर्शित 'सोनार केल्ला' चित्रपटात मुकुल या व्यक्तिरेखेचा पुनर्जन्म झाला आणि तोच चित्रपटाचा मुख्य आधार आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.