हिंदू धर्म एका जीवाने अनेक जन्म घेण्याच्या प्रक्रियेची अनेक कारणे सांगतात जशी की:
१ . आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी - एखाद्याने दुसरा जन्म घेण्याचे हे प्रमुख कारण आहे. पुण्य कर्मांचे फळ म्हणून व्यक्तीला स्वर्गप्राप्ती होते. सुखाच्या शोधात असणाऱ्यांना मृत्युलोक ( पृथ्वी ) प्राप्त होते. आणि पाप कर्म करणाऱ्यांना पातळ लोकात (नरक) जावं लागतं.
२ . आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी - जेव्हा एखादी व्यक्ती छंदी - फंदी बनते तेव्हा सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेण्यासाठी, आनंद लुटण्याची हाव तिच्या मनात उत्पन्न होते. हीच वासना / लालसा त्या जीवाला नवीन शरीर घेण्यासाठी प्रवृत्त करते.
३ . आपली अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी - जेव्हा एखादी व्यक्ती जीवन - मृत्यू चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून अध्यात्मिक साधना करत असते परंतु ती साधना पूर्णत्वाला जाण्या आधीच जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर असा जीव आपली अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी म्हणून नव्या शरीरात प्रवेश करतो.
४ . वृण ( कर्ज ) फेडण्यासाठी - जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दुसऱ्या कोणा व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे वृण असते आणि ते फेडायचे राहिल्यास, ते फेडण्यासाठी त्या जीवाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. तेव्हा तो जीव नातेवाईक, मित्र किंवा शत्रूच्या रूपाने जन्माला येतो.
५ . एखाद्या पुण्यात्माने दिलेला शाप भोगण्यासाठी - एखाद्या व्यक्ती चं घोर पाप कोणा देवाच्या किंवा ऋषिच्या क्रोधाला आमंत्रण देऊ शकतं. त्याचं फळ म्हणून त्या जीवाला एक आणखी जन्म घ्यावा लागतो आणि तो नवा जन्म मनुष्य रूपातच असणे आवश्यक नाही.
६ . मोक्षप्राप्तीसाठी - देव किंवा कोण्या गुरूंच्या कृपेने जीवाला मोक्ष प्राप्त करता यावा यासाठी नवीन शरीर मिळू शकते.