पेशवा ही मराठा साम्राज्यात प्रधान मंत्रींना दिली गेलेली पदवी होती. सुरूवातीला पेशवा छत्रपती (मराठा राजा ) च्या हुकूमाखाली असत पण नंतर ते मराठा साम्राज्याचे वास्तविक सरदार झाले आणि छत्रपति फक्त एक राजा राहिला. मराठा साम्राज्याच्या शेवटच्या वर्षांत पेशवेसुद्धा फक्त नावाला सरदार राहिले आणि श्रीमंत मराठे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच यांवर स्वामित्त्व गाजवू लागले.

सर्वात पहिले पेशवे होते मोरोपंत पिंगळे ज्यांना छत्रपती शिवाजी यांनी मंत्रांचे अध्यक्ष घोषित केलं होतं. चितपावन ब्राह्मण भट परिवाराच्या काळात पेशवे सत्तेचे खरे मानकरी झाले. पेशवे या पदाने सर्वात जास्त ख्याती बाजीराव प्रथम ( १७२०१७४० ) च्या काळात मिळवली. पण पेशवा रघुनाथ राव यांनी इंग्रजांशी एकी केल्यानतंर पेशव्यांची ताकद कमी होऊ लागली. १८१८ मध्ये ब्रिटीश साम्राज्याशी एकी केल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel