ॐ मेधां मह्यमंगिर सो मेधां सप्तर्षयो दुदु:
मेधामिंद्रश्चाग्निश्च मेधां धाता ददातु मे ।।
मेधां मे वरुणो राजा मेधा मेधां देवी सरस्वती
मेधां मे अशिवनौ दे वा वाधत्तां पुष्करस्त्रजा ॥
या मेधा अप्सरस्सु गंधर्वेषु च यन्मन:
दैवी या मानुषी मेधा सा मामाविशतादिह ॥
यत्मेऽनूक्तं तद्रमतां शकेयं यदनुब्रुवे
निशामितं नि शामये मयि श्रुतम् ॥
सह व्रतेन भयासं ब्रह्मणा संगमेमहि
शरीरं मे विचक्षण वाड्:गमे यधुमद् दुहे ॥
अवृध्दमहमसौ सूर्या ब्रह्मण आणी:स्था श्रुंत मे मा प्र हासी:
मेधा देवीं मनसा रेंजमानां
गंधर्वजुष्टां प्रति नो जुषस्व
मह्यं मेधां वद मह्यं श्रियं वद
मेधावी भूयासमजिरा चरिष्णु:॥
सदसस्पतिमद्भूतं प्रियमिन्द्रस्य काम्यस्
स निं मेधामयसिषं
यां मेधां देवगणा: पितरशेचोपासते
तया मा मेधयाऽग्ने मेधाविनं कुरु ॥
मेधाव्यहं सुमना: सुप्रतीक: श्रध्दामना: सत्यमति: सुशेव:
महायशा धारयिष्णु: प्रवक्ता भूयासमस्येश्वरया प्रयोगे ॥

''अंगिरस ऋषी व इतर सप्तर्षी, तसेच इंद्र, अग्नी व सृष्टिकर्ता हे मला बुध्दी देवोत. नीतिदेव, वरुणराजा व देवी सरस्वती मला बुध्दी देवोत. कमळांचे हार घालणारे अश्विनिदेव मला बुध्दी देवोत. जी मेधा गंधर्वलोकात आहे, देवलोकात आहे, मानवलोकात आहे, अशी ती त्रिभुवनव्यापक मेधा माझ्या बुध्दीत शिरो. जरी मी वरचेवर पठन केले नाही, तरीही जे पठन केले ते कायमचे मजजवळ राहो. जे मी शिकलो, ते वाटेल तेव्हा मला बोलता येऊ दे, जे ऐकेन ते कायमचे ऐकल्यासारखे होवो. इतर व्रतवारी लोकांप्रमाणे माझे व्रत असो. विद्वान लोकांशी माझा संबंध येऊ दे. माझी इंद्रिये जिज्ञासू असू देत. माझी वाणी मोहाचा तिरस्कार करणारी असू दे. वरवर गोड बोलणारी व मनात  विष बाळगणारी नसू दे. माझा उत्साह अखंड असो. हा ज्ञानमय सूर्य माझे ज्ञान कधीही नष्ट न करो. बुध्दीत चमकणारी अशी जी ही मेधा दिव्य लोकात असणारी ही जी मेधा, ती मला मिळो. मला मेधा द्या, तेज द्या. मला बुध्दिमान होऊ दे. हे शरीर जरी जीर्ण झाले, तरी त्यातील बुध्दी अजर अशी असो, बुध्दी सदैव तेजस्वी असो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel