हे भारतीय इतिहासातलम सर्वाधिक काळ असलेलं साम्राज्य आहे. हे दक्षिण भारतात राज्य करत होते. व यांची राजधानी मदुराई (तमिल नाडू ) होती. इ.स. पूर्व २६ मध्ये पंड्या साम्राज्याचा सर्वात पहिला भारतीय राजदूत रोम ला गेला. या साम्राज्याने राजा कदुन्गन (इ.स. ५९०-६२०), अरिकेसर मरावर्मन (इ.स ६७०-७००), वरगुनामहाराज पहिले(इ.स.६५६- ८१५) आणि श्रीमारा श्रीवल्लभा (इ.स. ८१५-८६१) या राजांच्या कारकिर्दी दरम्यान श्रीलिंका व केरळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. पंड्यांचा प्रभाव अ.श. १२५१ ते १२६८ मध्ये जतावर्मान सुंदरच्या शासनाखाली येऊन भरभराटीस आला. १३११ मध्ये दिल्ली तख्ताने मदुरैवर हल्ला केला तेव्हा पंड्या स्थानिक राज्यकर्त्यांमध्ये परिवर्तीत झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.