ताम्र सम्सोनोवा


ताम्र सम्सोनोवा बरीच वृद्ध होती जेव्हा समाजसेवा करणाऱ्या लोकांनी तिला संत पीटर्सबुर्घ च्या एका युद्ध सैनिकाच्या घरी रहायला पाठवलं. या उपकराची परतफेड करायच्या ऐवजी तिने त्यांचा खून केला. याशिवाय अनेक जवळच्या लोकांचीही हीच अवस्था झाली ज्यात तिच्या नवऱ्याचाही समावेश आहे.

स्मसोनावाचं वय ( अटक झाली तेव्हा ६८ वर्ष  ) असल्याने लोकांचा या क्रुरपणावर विश्वास बसला नाही. ती नेहमी खून करून त्या शरिराला खाऊन टाकायची. असं इनेक वर्ष चाललं. तिचा नवरा, जो सम्सोनोवाला अटक होण्याच्या १० वर्ष आधीच गायब झाला होता,  सुद्धा तिच्या सुरूवातीच्या बळींमधलाच एक होता. जेव्हा एका टी. व्ही. कॅमेरात ती शरिराचे अवयव कचऱ्यात फेकताना दिसली तेव्हा तिला पकडण्यात आलं. जेव्हा अजुन खोलात जाऊन तपास झाला तेव्हा तिची आणखी वाईट कामं निदर्शनास आली. तिच्या डायरीत तिने तिच्या भक्षणाचा उल्लेख केला होता आणि त्यात हे ही लिहीलं होतं की ती फुफुस्सांना काढुन खायची.

 

मिडीयाने या गोष्टीला उचलुन धरलं. आणि सम्सोनोवालाग्रॅनी रिपरअसं नाव दिलं. आधी तिने गुन्हे कबुल केले. नंतर तिने या सगळ्या खुनांची कारणं सांगितली. तिला फक्त एकसिरीयल किलरम्हणून ओळख मिळवायची होती. सम्सोनोवाला अजबनही शिक्षा झालेली नाही कारण तपास अजुन चालु आहे.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel