‘दु:खाची सत्ता? छट् दु:खाची सत्ता मी कधीच मान्य केली नाही. दु:खे आली, गेली. आकाशात ढग येतात, जातात. आकाश पाठीमागे निळे निळे हसते. तसे माझे, दुखा:ची मी टर करायचो. दु:खे माझ्यावर कोसळली तर खदखदा हसायचो.’

दु:खदेवता निघून गेली. दुसरी बहीण आली. ती खिन्न व उदास होती. सुस्कारे सोडीत येत होती. शून्य दृष्टीने बघत होती.

‘आपले नाव काय?’ माधवाने विचारले.

‘निराशा.’

‘काय काम?’

‘एक विचारायचे आहे.’

‘विचारा.’

‘माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही?’

‘निराशेची सत्ता? छट्, बिलकूल नाही. एकदा जीवनात निराशा जरा डोकावली होती; परंतु दिली तिला खोल दरीत लोटून. निराशेच्या झिंज्या धरून तिला मी हाकलून दिले आहे. निराशा मला ठाऊक नाही.’ निराशा गेली. तिसरी बहीण आली. तिचे डोळे खोल गेले होते. नाकाचा गोंडा दिसत होता.

‘काय आपले नाव?’ माधवाने विचारले.

‘चिंता.’

‘काम काय!’

‘एक विचारायचे आहे.’

‘विचारा’

‘माझी सत्ता मान्य करता की नाही?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel