‘मी तुमच्या नवसाने पहिला आलो की, माझ्या बुद्धिमत्तेने?’

‘आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने आला असलात, तरी ती कोणाची देणगी? त्याची ऐट तुम्हाला कशाला? बुद्धी हीसुद्धा देवाचीच देणगी आहे.’

‘खरे आहे. मी एक क्षुद्र जीव आहे.’

‘परंतु क्षुद्र देवही कोणाचा जीव आहे.’

‘हो असेल.’

‘मी जाते. आज रात्री राजधानीत दीपोत्सव आहे. तुम्ही रात्री पाहायला याल?’

‘हृदयात अंधार असेल तर बाहेरचे दिवे काय कामाचे?’

‘तुम्ही तुमच्या हृदयात दिवा लावा. जगात सर्वत्र प्रकाश असता तुम्ही स्वतःच्या हृदयाची दारे बंद का करता? आणि मग प्रकाश नाही म्हणून रडता का? आपणच दिवा विझवायचा व पुन्हा अंधार आहे म्हणून रडायचे, हे बरे नव्हे.’

‘तुम्ही किती सुंदर बोलता? परंतु माझ्यासाठी नवस का केलात ते सांगा.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel