सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel