असल्या या गढूळ व रोगट वातावरणात ध्येयवादाला किंवा कोणत्याही थोर भावनांना कोठेच थारा मिळत नाही, आणि राज्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे चालणार्‍यांना मोठा अधिकार व मोठा पगार ही पारितोषिके ठेवलेली असतात.  राज्यकर्त्यांचे जे कोणी पाठीराखे असतील ते कितीही नालायक किंवा त्याच्याही पलीकडचे असले तरी त्यांना निभावून घेणे राज्यकर्त्यांना प्राप्तच असते, कारण सरकारच्या विरोधकांना दडपून टाकण्यात प्रत्यक्ष हातभार कोण किती लावतो, एवढ्यावरच प्रत्येकाची लायकी ठरत असते.  याचा परिणाम असा होतो की, सरकाराला भलभलत्या लोकांची व विचित्र राजकीय पक्षांची संगत लागते.  लाचलुचपत, क्रूरपणा, दुष्टपणा व प्रजेच्या कल्याणाची काही एक पर्वा न ठेवण्याची वृत्ती या दुर्गुणांना ऊत येतो, त्यांची दुर्गंधी जिकडे तिकडे पसरून सारे वातावरण विषमय होते.*
--------------------------------------
*    बंगालमधील राज्यकारभाराबाबत चौकशी करण्याकरिता सर आर्चिबाल्ड रोलंडस् यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने ती चौकशी करून तिचा वृतान्त सन १९४५ च्या मे महिन्यात प्रसिध्द केला.  त्यात या समितीने म्हटले आहे ''लाचलुचपतीचे प्रकार जिकडे तिकडे इतके बोकाळले आहेत व त्या बाबतीत कोणाचे काही चालणार नाही अशी नैराश्यवृत्ती सर्वत्र अशी काही पसरली आहे की, सार्वजनिक नीतिमत्ता व सरकारी नोकरांची दानत यांत मातलेला हा भ्रष्टाचार समूळ नाहीसा करायला अत्यंत जालीम उपाय योजणे अवश्य आहे असे आम्हाला वाटते.''  बड्या मुलकी अधिकार्‍यांपैकी काही अधिकार्‍यांची वृत्ती सर्वसामान्य प्रजेशी वागताना बरीच अनिष्ट असल्याबद्दलचा पुरावा समितीपुढे आला तेव्हा समितीने त्याबद्दल आपल्या निवेदनात खेद व आश्चर्य प्रकट केले.  ते असे की ''इतर लोकांहून आपण कोणी वेगळेच, आपण स्वर्गातून उतरलो आहोत असा आव ते आणतात व लोकांशी फटकून वागतात.  जिवंत प्रजेचे कल्याण कसे होईल इकडे लक्ष देण्याऐवजी निर्जीव राज्ययंत्राच्या विविध क्रिया आपल्या डोक्याला काही एक शीण न देता आपोआप कशा चालतील इकडेच त्यांचे लक्ष अधिक असते.  प्रजेचे सेवक म्हणून वागण्यापेक्षा स्वत:ला प्रजेचे स्वामी मानण्याकडे त्यांचा कल अधिक दिसतो.''

सरकार ज्या काही गोष्टी करते त्यांपैकी बर्‍याच गोष्टींचा लोकांना राग येतोच, पण त्याहीपेक्षा लोकांना विशेष चीड येते ती या सरकारचा वेळी अवेळी पाठपुरावा करणारे जे हिंदी लोक असतात त्यांच्या स्वत: राजापेक्षाही काकणभर अधिक राजनिष्ठची.  कोणाही सामान्य हिंदी माणसाला हे असले राजनिष्ठचे किळसवाणे प्रदर्शन पाहून ओकारी येते आणि जर्मनांनी ह्या महायुध्दात फ्रान्सचा पाडाव केल्यावर त्यांच्यापुढे गोंडा घोळणारे व्हिशी सरकार किंवा जर्मनांनी व जपान्यांनी ठिकठिकाणी उभी केलेली तकलुपी सरकारे यांच्याइतकीच या राजनिष्ठांची किंमत हिंदी जनता श्करते.  या असल्या राजनिष्ठ लोकांबद्दल वाटणारा हा तिटकारा केवळ काँग्रेसमधील लोकांनाच वाटत नसून मुस्लिम लीगमधल्या व इतर पक्षांनाही वाटतो आणि आमच्या हिंदी राजकारणातले नेमस्तातले नेमस्त देखील हेच स्पष्ट बोलून दाखवतात.*
---------------------------
*    लोकांच्या मानेवर आपले जू लादण्यात पटाईत असलेला हिटलर आपल्या 'मीन काम्फ' या पुस्तकात म्हणतो, ''तत्त्वनिष्ठा, करारीपणा, शील यांचा लवलेशही अंगी नसल्यामुळे सतत लोटांगण घालण्याची जी काही वृत्ती असते तिचे मूर्तिमंत पुतळे बनलेले लोक एकाएकी पश्चात्ताप पावून आपल्या देहस्वभावाविरुध्द वागू लागतील अशी अपेक्षा करणे म्हणजे आपली बुध्दी, मानवजातीचा आतापर्यंत अनुभव यांना फाटा देणे होईल. आपोआप पश्चात्ताप होणे तर बाजूलाच राहिले, उलट असल्या लोटांगणपरायणांना कोणी चांगले शिकवू म्हटले तर हे तसल्या शिकवणीपासून चार हात लांबच राहू म्हणतील; आणि ही त्यांची वृत्ती त्यांच्या सार्‍या देशबांधवांना पारतंत्र्याचे जोखड खांद्यावर बाळगण्याची एकदा पक्की सवय जडेपर्यंत, किंवा ह्या नीच घरभेद्यांच्या हातून सत्ता हिसकून घेण्याकरिता त्या देशबांधवांतूनच सत्प्रवृत्त व कणखर लोक निघेपर्यंत तशीच राहते.  देश कायमचाच पारतंत्र्यात रुतला तर जेत्यापुढे गोंडा घोळणार्‍या या नीचांचे चांगले चालते, कारण मग जितराष्ट्रातील गुलाम बनलेल्या प्रजाजनांना फटके त्यांच्याकडून बिगार काम करून घेण्याची कामगिरी बहुधा या गोंडेबहाद्दरावरच परकी राज्यकर्ते सोपवितात, आणि मग हे शीलभ्रष्ट देशबुडवे आपल्या देशबांधवांवर आपली सत्ता अशी काही चालवतात की, तो देश जिंकून घेणार्‍या त्या परक्या शत्रूने कोणी परकीय पशू अधिकारी प्रजेच्या डोक्यावर बसवला तर त्याच्यासुध्दा हातून असले अनन्वित प्रकार घडत नाहीत.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to श्याम


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल