एकदा एका रानडुकराला एक गाढवाचे पोर रानात भेटले. तेव्हा ते गाढव चेष्टेने रानडुकराला म्हणाले, 'रामराम हो भाऊ रामराम !'

गाढवाचे ते सलगीचे बोलणे ऐकून डुकर खूप चिडले. परंतु आपला राग आवरून ते म्हणाले,

'हे हलक्या प्राण्या तू आपल्या वाटेने जा. तुला ठार मारण्यासाठी मला एक क्षणही वेळ लागणार नाही. परंतु गाढवाच्या रक्ताने माझे तोंड विटाळण्यास मी तयार नाही.'

तात्पर्य

- मूर्ख लोक स्वतःस फार शहाणे समजून मोठ्यांची चेष्टा करायला जातात परंतु मोठे लोक मात्र त्यांना सोडून देतात हे यांचे सुदैवच म्हटले पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to इसापनीती कथा १०१ ते १५०


इसापनीती चरित्र आणि कथा १-५०
इसापनीती कथा २०१ ते २५०
अघोरी
गावांतल्या गजाली
तल्लफ
बौद्ध भिक्खू
संत सेनान्हावींचे अभंग
बिटकॉईन विषयी थोडेसे
महाभारताशी संबंधित स्थाने
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे  अजूबे
लोकांना इम्प्रेस कसे कराल
सत्यनारायणाच्या कथेचे सत्य
अरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल ?
तिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल?
इसापनीती कथा ५१ ते १००