एके दिवशी एक कुत्रा तोंडात भाकरीचा तुकडा धरून नदी उतरून पलीकडे जात होता त्यावेळी त्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. तेव्हा त्याला असे वाटले की दुसरा कोणी कुत्रा भाकरी तोंडात घेऊन जात आहे. त्याची ती भाकरी आपण पळवावी असा विचार करीतच त्याने तोंड उघडले आणि त्याचबरोबर त्याच्या तोंडातील भाकरी नदीत पडली व अगदी तळाशी गेली. ती पुन्हा त्याला सापडली नाही.
तात्पर्य - देवाने आपणास जे दिले आहे त्यात समाधान न मानता जो दुसर्‍याचे घेण्याचा विचार करतो त्यास दुसर्‍याचे न मिळता त्याच्याजवळ असते तेसुद्ध जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel