एका कुत्र्याने लांडगा आणि गिधाड यांना पंच नेमून, त्यांच्यापुढे बोकडावर कर्जाबद्दल फिर्याद केली. पंचांनी कुत्र्याचा साक्षीपुरावा न घेता व प्रतिवादी बोकडाच्या भाषणाकडे लक्ष न देता बोकड अपराधी आहे, असा निकाल दिला. मग कुत्र्याने बोकडाचा तात्काळ जीव घेतला व त्याचे मांस त्या तिघा लुच्चांनी वाटून खाल्ले.

तात्पर्य

- फिर्यादी आणि न्यायाधीश हे एक झाल्यावर प्रतिवादी किंवा आरोपी यांचा नाश होण्यास उशीर लागत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel