**नेहपान गुरुत्वीय पटल चंद्र-३ **

काही क्षणातच ते निष्कासयान नेहपान ग्रहाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुत्वीय पटलातील तिसऱ्या चंद्रावर उतरले. अजातरिपू आणि हंसरेखा त्या निष्कासयानातून बाहेर उतरले.

“हि आहे तुझी प्रयोगशाळा? या निर्जन बर्फाळ उपग्रहावर?”  

“ होय मला शांत ठिकाणी माझं काम करणे पसंत आहे. माझ्या व्यतिरिक्त या प्रयोगशाळेत प्रवेश करणारी तू दुसरी व्यक्ती आहेस.” अजातरिपूने एका त्रिकोणी इमारतीकडे बोट दाखवले.

“ हे काय हि तर पूर्ण बर्फापासून बनवलेली आहे. हि प्रयोगशाळा तू स्वत: बनवली आहेस का?"

“ नाही नाही ह्या प्रयोगशाळेचा निर्माण तर माझ्या इगलूने केला आहे.”

“ इगलू?”

एक रोबोट प्रयोगशाळेच्या दारात स्वागतासाठी उभा होता. इग्लुने त्या दोघांसाठी गरम सूप आणलं होतं.

“ हा इगलू माझं सर्वात पहिलं यांत्रिक अपत्य. घे हे सूप प्यायल्यामुळे तुझ्या शरीराला या ग्रहावरील थंड हवामान सहन करण्याची उर्जा मिळेल.”

दोघांनी सूप प्यायले आणि ते प्रयोगशाळेत दाखल झाले.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel