२३८. क्षपणक - (भिक्षूला पाहून मोठ्यानें) रे भिक्षुक, इकडे ये जरा. तुला कांही विचारूं इच्छितों.
भिक्षु – (रागानें) रे पाप्या पिशाचाकृते ! हें काय बडबडतोस?
क्षपणक - अरे रागावूं नकोस. कांहीं शास्त्रार्थ विचारतों.
भिक्षु – रे क्षपणक, शास्त्रार्थ देखील जणतोस? असूं द्या. ( त्याच्या जवळ जाऊन) काय विचारावयाचें आहे?
क्षपणक – हें सांग, क्षणविनाशी असा जो तूं हें व्रत कां धारण करतोस?
भिक्षु – अरे ऐक. माझ्या चित्तसंततींतून उत्पन्न होणारा विज्ञानवान् असा कोणी तरी वासनाक्षय करून मोक्ष मिळवील.
क्षपणक – अरे मूर्खा, कोणत्या तरी मन्वंतरांत कोणी तरी मुक्त होणार. त्यामुळें सध्या नाश पावणार्या तुला त्याचा काय उपयोग? आणखी विचारतों कीं, असला हा धर्म तुला कोणी उपदेशिला?
भिक्षु – खात्रीनें हा धर्म सर्वज्ञ भगवान् बुद्धानें उपदेशिला आहे.
२३९. क्षपणक - अरे, बुद्ध सर्वज्ञ हें तुला कसें समजलें?
भिक्षु - अरे, त्यानेंच उपदेशिलेल्या आगमांनी बुद्ध सर्वज्ञ ठरत नाहीं काय?
क्षपणक – अरे त्यक्तबुद्धे! जर त्याच्याच वचनानें तो सर्वज्ञ असें तुला वाटतें, तर मी देखील सर्व जाणतों कीं, तूं तुझ्या बापजाद्यांसह सात पिढ्यांपर्यंत आमचा दास आहेस.
भिक्षु – (रागानें) रे चांडाळा, चिखलाने माखलेल्या पिशाचा! तुझा मी दास?
क्षपणक – अरे विहारदासीभुजंगा, दुष्टपरिव्राजका! हा मी एक दृष्टांत दिला. तेव्हां तुझ्या कल्याणाची गोष्ट निर्भयपणें सांगतों. बुद्धाचा धर्म सोडून अर्हंतांच्या शासनाचा स्वीकार कर, व दिगंबरव्रत धारण कर.
भिक्षु - अरे पाप्या! स्वत: नष्ट होऊन दुसर्यांचाहि नाश करूं इच्छितोस काय? हें आमचें उत्कृष्ट स्वाराज्य सोडून असा कोण अनिंदित मनुष्य असूं शकेल जो तुझें हें निंद्य पिशाचव्रत धारण करील?
२४०. ( त्यानंतर त्या दोघांचा थोडा वाद होतो. शांति व करुणा दुसरीकडे जाऊं इच्छितात. इतक्यांत कापालिकरूपधारी सोमसिद्धान्त प्रवेश करतो. तेव्हां क्षपणक त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणतो.)
क्षपणक - अरे कापालिका! मनुष्यांच्या हाडांच्या माळा धारण करणार्या तुझा धर्म कोणता व मोक्ष कोणता?
कापालिक - अरे क्षपणका, आमचा धर्म कोणता तें ऐक. आम्ही मनुष्याचा मेंदू, आंतडीं, वसा आणि मांस यांनी भरलेल्या आहुती देतों; व मनुष्याच्या डोक्याच्या कवटींतून सुरापान करून पारणें फेडतों. नुकत्याच कापलेल्या मनुष्याच्या गळ्यांतून निघालेल्या रक्ताच्या धारांच्या बलिदानानें आम्ही महाभैरवाची पूजा करतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.