सर्व साधारणपणे मंदिरांमध्ये भगवान शिव शंकराचे शिवलिंग आपण पाहतो. परंतु काही वेळेस आपणास शंकराची ध्यानमग्न मूर्ती पहावयास मिळते. भगवान शिवशंकर कोणाची पूजा करत असत आणि कोणाच्या ध्यानात मग्न असत? हा प्रश्न आपल्याला आयुष्यात कदाचित एकदा तरी पडत असेलच.

योगसाधनेच्या ८ पायऱ्या आहेत. योग तत्त्वज्ञानानुसार, 'समाधी' अवस्था ही योगसाधनेची शेवटची पायरी आहे.

१. यम

२. नियम

३. आसन

४. प्राणायाम

५. प्रत्याहार

६. धारणा

७. ध्यान

८. समाधी

केवळ एक निरोगी आणि सच्चा योगीच समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो आणि तोही अनेक वर्षांच्या अध्यात्मिक अभ्यासानंतरच! समाधी अवस्थेमध्ये आत्म्याचा परमात्म्याशी साक्षात्कार होतो  म्हणजेच आत्मा परमात्म्याच्या इतका जवळ जातो की तो स्वतः परमात्मा बनतो आणि त्याच्या आनंदात रममाण होतो.

समाधीच्या वेळची परिस्थिती शब्दात वर्णन करता येत नाही, ती केवळ अनुभवता येते. क्वचितच एखादा योगी पुरुष ही समाधीची स्थिती प्राप्त करतो. भगवान शिवशंकर हे खरे योगी होते म्हणून त्यांना समाधीची अवस्था प्राप्त होत असे.

भगवान शिवशंकर स्वत: परमात्मा नव्हते तर ते निर्गुण निराकार परमात्म्याचे खरे भक्त होते आणि नियमानुसार सकाळ संध्याकाळ देवाची आराधना करत असत. जर ते स्वत: परमात्मा असते तर ते इतर कोणाचे ध्यान का बरे करत असतील.

यावरून हे लक्षात येते कि ते केवळ निराकार भगवंताचेच ध्यान करायचे, म्हणूनच ते एकांतात जाऊन समाधी घेत असत. ते धार्मिक आणि संयमी व्यक्तिमत्त्वाने समृद्ध होते.

ते कैलासात राहत असत म्हणून त्यांना कैलासपती म्हटले जाते. समाधीत लीन झालेले भगवान शिवाचे दिव्य रूप सर्वांना शांती देते. त्यांना पाहून आपल्याला ध्यान करण्याची प्रेरणा मिळते.

भगवान शिवाचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा डोळा. हा डोळा प्रत्येकाला असतो, पण ऐहिक इच्छा-वासनेत अडकलेल्या माणसाचा हा डोळा बंदच राहतो. समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत गेल्यावर हा डोळा स्वतःच उघडतो. तो उघडताच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. संसाराची आसक्ती निघून जाते आणि मोक्ष प्राप्त होतो.

शिवाची ही मूर्ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कारण या मूर्तीमध्ये भगवंताचे ध्यान करण्याची पद्धती दाखवण्यात आली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel