आणि आपट्याचे सोने लुटायला भाऊ जातो. घरी येतो व बहीण त्याला ओवाळते :

दसर्‍याचे दिशीं             आपट्याची लुटालुटी
सारंगी घोडा पिटी             गोपूबाळ

अंबाबाईला बायकांचे नवस असायचे :

नवस मी केला             मनांतल्या मनांत
मला पावली जनांत             जोगेश्वरी

ज्या गोष्टींसाठी नवस केला, ती गोष्ट मिळाली. आता मला नवस फेडू दे :

नवस मी केला             नवसाजोगी झाल्यें
नवस फेडूं आले             जोगेश्वरीचा

लहान मुलगी सासरी गेलेली. तिचा सांभाळ अंबाबाईने करावा म्हणून माता नवस करते :

नवस मी केला             अंबाबाईला कमळ
परदेशीं तू सांभाळ             उषाताईला
नवस मी केला             अंबाबाईला ताम्हन
परदेशी गेली लहान             उषाताई

अंबाबाईच्या पाया पडून स्त्री म्हणते :

आई अंबाबाई             पडते पायां लेक
चुडे अभंग राख                 जन्मवेरी

शिमग्याच्या सणात बहिणीचे भाऊ डफ हाती घेतात. ते क्षणभर गमतीसाठी खेळी बनतात. बहीण कौतुकाने म्हणते :

शिमग्याच्या सणा         भाऊ माझे खेळी
डफावर जाळी                 मोतियांची

अशी ही वर्णने आहेत. मिळाल्या ओव्या त्या देत आहे :

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel