आम्ही गीत तुझे गाऊ

भारतमाते ! तुझ्या ध्वजाला नमन करित राहू !

तुझा हिमालय, तुझीच गंगा

सह्याद्रीच्या तुझ्याच रांगा

आम्ही यांच्या अभिमानाने नित्य फुलत राहू

आम्ही गीत तुझे गाऊ !

अनेकरुपी जनता, बांधव

तरि समतेचा करिती आठव

हात गुंफुनी हातामध्ये तुझे रुप पाहू

आम्ही गीत तुझे गाऊ !

किती महात्मे, किती धुरंधर

लढले - लढती अजुनि निरंतर

सुखशांतीच्या नवसंदेशा दहा दिशा नेऊ,

आम्ही गीत तुझे गाऊ !

दलितांच्या दारामधला

दिवा नव्याने उजळायाला

नव्या शक्‍तिने, नव्या प्रीतीने पुढे पुढे जाऊ

आम्ही गीत तुझे गाऊ !

तू माता वरदान देशि तर

तुझी लेकरे सारी कणखर

झेंडा फडकत ठेवतील तव, ही आशा ठेवू

आम्ही गीत तुझे गाऊ !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel