के फिन्ना गांवांत एक चांग नांवाचा व्यापारी राहात असे पैसे मिळविणे हा एकच त्याचा धंदा होता. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने एक उपाय केला. चांदीची नाणी गाळून त्यांची चांदी पंधरा शेराची एक लड अशा लडी करून ठेवल्या. अशा एकंदर आठ लडी झाल्या त्यानंतर मात्र त्याने काही हि शिल्लक टाकलें नाहीं. त्याने त्या सर्व लडी लाल फितीने बांधून आपल्या उशीच्या जवळ ठेवल्या होत्या. रोज रात्री निजतांना तो हाताने एकदा चांचपडून पाहात असे आणि त्यांच्या स्पर्शाने तो खूष होत असे. चांगला चार मुलगे होते. त्यांनी आपल्या वडिलांचा सत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा केला. सर्व कार्यक्रम संपल्यावर त्याने आपल्या चौघां मुलांना बोलाविलें.

त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून तो म्हणाला, "मुलांनो, मी सर्व आयुष्यभर पैसे मिळवून जमविण्याचेच काम केले. माझ्याजवळ जेवढे धन आहे त्या सर्वांचा लडी बनवून घेतल्या आहेत. आणि त्या लडींच्या चार थैल्या बांधून मी माझ्या उशाशी ठेवल्या आहेत. त्या सर्व लाल फितींनी बांधल्या आहेत. एकदा चांगला दिवस पाहून मी त्या तुमच्या स्वाधीन करणार आहे. तुम्ही त्या नीट संभाळून ठेवा. की त्यांचा उपयोग होईल."

त्या दिवशी रात्री झोपतांना चांगनें आपल्या संवयीप्रमाणे चांचपडून पाहिले. मनातल्या मनांत हंसला आणि झोपी गेला. त्याचा डोळा लागतो न लागतो तोच त्याला आपल्या खोलीत कोणीतरी माणूस असल्याचा भास झाला. तो पलंगावर उठून बसला. खोलीत दिवा जळत होता. त्याच्या उजेडात त्याने पाहिले. त्याला आठ उंच धष्टपुष्ट अशी माणसें दिसली. त्या सर्वांच्या अंगावर पांढरे कपडे होते आणि कमरेंत लाल पट्टे होते. त्यांना चांगनें पाहतांच ते त्याच्या जवळ आले. लांबून नमस्कार केला.

तो म्हणाले, “सरकार, आम्ही सर्व भाबडे आहोत. परमेश्वराने आम्हाला तुमच्याकडे पाठविले होते. आजपर्यंत आम्ही आपल्यापाशी राहिलों, परंतु आपण आमच्याकडून कांहींच सेवा करून घेतली नाहीत. उलट मोठ्या काळजीपूर्वक सतत आपल्याजवळच ठेविलेत. आता आपले दिवस भरत आले आहेत. आम्हाला वाटत होते की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आम्हालाजवळ ठेवाल. परंतु आम्हांला असे कळले की तुम्ही आम्हांला आपल्या मुलांच्या स्वाधीन करणार आम्हांत. पण आम्ही त्यांची सेवा करूं शकणार नाही. म्हणून आम्ही तुमचा निरोप घ्यावयास आलो आहोत. आम्ही या जवळच्याच खेड्यांत वांगच्या घरी जात आहोत.

भेट्या पुन्हा कधी तरी. असें म्हणत ते मार्गे फिरले आणि झटपट खोलीच्या बाहेर पडले. चांग आश्चर्याने पलंगावरून खाली उतरला. त्या आठ जणांना गाठण्यासाठी घाईघाईने तो त्यांच्या मागे निघाला. त्या गडबडीत त्याला ठेच लागली आणि तो खाली पडका. त्याने डोळे उघडून पाहिले तर तो पलंगावरच होता. तेव्हां त्याला वाटले की आपल्याला स्वप्न पडले असावे. तरी सुद्धा एकदा नीट पाहिलेले बरें, म्हणून तो पलंगावरून उठला. दिवा मोठा केला आणि चोहोकडे पाहिले, तेथे कोणी नव्हते. मग त्याने उशी जवळ चाचपडून पाहिले. आणि खरोखरच स्वप्न खरें झालेले त्याला समजले.

त्याला धस्स झाले. वांग कोठे राहातो हे त्याला माहीत असल्याने ह्या गोष्टीचा पडताळा पाहण्याचे त्याने ठरविले. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून तो त्या गांवीं गेला. बांगचें घर शोधून काढले. तेथे गेला. त्या दिवशी त्यांच्या घरी काही तरी विशेष होते. चांग त्याच्या घरी गेल्यावर बांगने त्याचे स्वागत केले.

“आज आपल्या घरी काय आहे?" चांगने विचारले.

"तसे काही नाही. माझी बायको बरेच दिवसांपासून आजारी होती. काल ज्योतिष्याने सांगितले की जोपर्यंत तिचा पलंग हलवणार नाही तोपर्यंत तिला उतार पडणार नाही. आणि योगायोग काल रात्रींच तिला एक स्वप्न पडले. तिला आठ तरुण दिसले आणि म्हणाले की आम्ही आजपर्यंत चांगच्या घरी नोकरी करीत होतों व आता आम्ही येथे आलो आहोत आणि ते तिच्या पलंगा खाली घुसले. स्वप्न संपले. माझ्या बायकोला दर दरून घाम सुटला आणि सर्वच आश्चर्य. तिचा आजार हळू हळू कमी होऊ लागला म्हणून आम्ही आज लागलीच तिचा पलंग हलविला. तेव्हां आम्हांला तिच्या पलंगाखाली तांबडया फितींनी बांधलेल्या आठ चांदीच्या लडी मिळाल्या. देवाच्या कृपेनें आम्हांला ते धन मिळाले आहे म्हणून आम्ही त्याची पूजा करीत आहोत." वांग म्हणाला.

चांगने सुद्धा आपली सविस्तर हकीगत त्याला सांगितली आणि म्हणाला

"देवाची मर्जी. पण मला एकदा त्या लख्या पाहाव्याशा वाटत आहेत." वांगने आपल्या नोकरांच्या करवीं मागवून त्या लख्या त्याने चांगला दाखविल्या.

त्या पाहतांच त्याच्या डोळ्यांत पाणी आले. चांगला त्याची दया आली. त्याने त्यांतील थोडी चांदी त्याला देण्याचा विचार केला.

"हे घ्या." म्हणून वांगनें त्यांतील दहा तोळे चांदी काढून चांगला दिली.

इतकी सर्व चांदी गमावल्यावर एवढीशीच घेऊन काय करायचे म्हणून त्याने ती नाकारली.

"नको मला. नुसतें एकदा पाहावेसे वाटले. एवढेच." चांग म्हणाला.

तो नको नको म्हणत असतां वांगनें बळजबरीने त्याच्या बाहीत ती टाकली. चांगने परत देण्यासाठी हात झटकला, परंतु त्याला ती कोठे दिसली नाही. शेवटी चांग वांगचा निरोप घेऊन घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी वांगचे नोकर जेव्हां घर झाडू लागले. तेव्हां त्यांना ती उंबरठ्याशी पडलेली दिसली. चांदीचा तो दहा तोळ्याचा तुकडा पाहतांच वांगच्या डोळ्यासमोर चांग आला. अचानक त्याच्या तोंडून हे शब्द निघाले

"चांगचे भाग्य."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel