मकर राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावामुळे कठोर परिश्रम करण्याची भीती वाटत नाही. शांतता, गांभीर्य आणि विचारशक्ती त्यांच्या स्वभावात अधिक आहे. त्यांच्या वाढत्या वयात त्यांना अनेकदा संघर्षाला सामोरे जावे लागते. कधी कधी या राशीचे लोक काहीतरी विचार करतात आणि घडते काहीतरी वेगळेच.
पॉजिटिव्ह
२०२२ हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि सहजतेने परिस्थितीशी जुळवून घ्याल. उत्पन्न वाढण्याच्या अनेक शक्यता असतील. मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील. रखडलेली सरकारी कामे प्रभावी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. भविष्यातील योजनांसाठी नवीन शक्यता तपासल्या जातील आणि त्यात यश मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील. धार्मिक भेटींचीही संधी मिळेल. विद्यार्थी आणि युवक कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकतात.
निगेटिव्ह
या वर्षी तुम्हाला अनेक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडूनच तुमची फसवणूक होऊ शकते. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. मुलाच्या करियर किंवा लग्नाशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही चिंतेत राहाल. वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा, आपण आपलेच नुकसान करून बसाल. वादग्रस्त बाबींना वाव देऊ नका. कारण परिस्थिती प्रतिकूल असेल आणि निर्णय तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये विरोधकांच्या कारवायांवर विशेष लक्ष द्या. निष्काळजीपणामुळे तुमचे कोणतेही काम बिघडू शकते.
व्यवसाय
२०२२ मध्ये व्यावसायिक क्रियाकलाप वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्यावर अधिक लक्ष द्या. यामुळे तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन करण्यास मदत होईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. फसवणूक होऊ शकते. या अगोदर नोकरीत अडचणी येत होत्या. त्या सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. स्पर्धेचे निकाल आपल्याबाजूनेच येतील. त्यामुळे सकारात्मक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
प्रेम
२०२२ मध्ये कुटुंबात शांततेचे वातावरण असेल. वैवाहिक संबंधात वादाची आणि भांडणाची परिस्थिती कायम राहील. पण एकमेकांना नीट समजून घेतल्याने अडचणी संपतील. प्रेमप्रकरणाच्या दृष्टीने हे वर्ष सुखद राहील. नाती घट्ट होतील. भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका हे ध्यानात ठेवा.